शेअर बाजारामध्ये पहिला शेअर घेण्यासाठी लागणाऱ्या महत्वाच्या गोष्टी.
शेअर मार्केट शिकण्याच्या या प्रवासात तुमचे स्वागत आहे. आज आपण शेअर बाजारातून पहिला शेअर घेण्यासाठी लागणाऱ्या महत्वाच्या प्रक्रिया (Process) जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया .....
तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची असल्यास तुम्ही प्रथम दुकानात जाता त्याला पैसे देता आणि वस्तू घेता तसेच शेअर बाजारमध्ये पण आहे फक्त थोडं वेगळे आहे.
जस तुम्हाला वस्तू घायला दुकानात जायला लागते तसेच इथे पण दुकान आहे त्या दुकानाला Stock Exchnge असे म्हणतात. पण या दुकानात जायचे म्हंटल कि तुम्हाला त्या दुकानाचे अकाउंट उघडायला लागतात .
१. Trading Account - हे पाहिलं अकाउंट वस्तू खरेदी करण्यासाठी, इथून तुम्ही कोणताही शेअर खरेदी करून शकता .
२. Demat Account - हे दुसरं अकाउंट जी वस्तू तुम्ही घेतली ती ठेवायला, याला आपण तुमची पिशवी म्हणू, म्हणजेच Trading Account मधून तुम्ही शेअर खरेदी करणार आणि ते Demat Account (डिमॅट) मध्ये ठेवणार.
आता आपण वस्तू पण घेतली आणि ती ठेवली पण, पण मला एक सांगा शेअर खरेदी करताना आपण Trading Account मधून घेतला पण त्यात पैसे कुठून येणार फ्री मध्ये तर कंपनी देणार नाही त्यासाठी आपल्याला अजून एक अकाउंट लागते ते आपल्या सर्वाकडे आहे पण आणि ते अकाउंट म्हणजे Saving Account (बचत खाते).
३. Saving Account (बचत खाते) - या अकाउंट मधून तुम्ही पैसे Trading Account ला पाठवणार आणि मग ट्रेडिंग अकाउंट वरून तुम्ही शेअर खरेदी करणार .
Demat Account आणि Trading Account काढण्यासाठी तुम्हाला एखाद्या स्टॉक ब्रोकर कडे जावे लागते आणि त्याच्याकडून वरील दोन्ही अकाउंट ओपन करून घ्यावे लागतात.
हे दोन्ही अकाउंट ओपन करताना तुम्हाला काही पैसे द्यावे लागतात पण जर तुम्हाला फ्री मध्ये अकाउंट ओपन करायचे असेल तर सध्या ऑफर चालू आहे तिथून तुम्ही अकाउंट ओपन करू शकता.
त्याची लिंक मी खाली देत आहे आणि जर अकाउंट ओपन करताना काही अडचण येत असेल तर आपल्या Stocks_Marathi या इंस्टाग्राम पेज ला मेसेज करा तुमची नक्की मदत केली जाईल .
अकाउंट ओपन करण्यासाठी येथे क्लिक करा Creat My Account
ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये कळवा आणि तुमच्या या शेअर बाजार शिकण्याचा प्रवासासाठी तुम्हाला शुभेच्छा !!!

Comments
Post a Comment