शेअर बाजारच्या संकल्पना ? नमस्कार मित्रांनो, आज आपण शेअर बाजाराच्या (Market) संकल्पना (Concepts ) पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला शेअर मार्केट शिकताना त्याचा फायदा होईल. चला तर मग सुरु करूया.... १. समभाग (शेअर) : म्हणजेच एखाद्या कंपनीत आपण जेवढे शेअर घेतले आहेत तेव्हडा मालकीहक्क (Ownership). २. Exchange : म्हणजे जिथे शेअर्स ची देवाण घेवाण होते ते ठिकाण . e.g. NSE , BSE etc. ३. Volume : म्हणजे किती जणांनी एखाद्या शेअर्स मध्ये खरेदी किंवा विक्री केली आहे ती संख्या. ४. Market Capital : कंपनी किती मोठी आहे हे आपण Market Capital वरून ठरवतो. Market Capital = एका शेअर ची किंमत * एकूण शेअर्स ५. Face Value : या value ला Par Value असेही म्हणतात. Face Value ही १,२,५,१० एवढी असते आणि Dividend हा कंपनीच्या Face Value वर दिला जातो. ६. Index : विशिष्ठ stocks च्या समूहाला म्हंटले जाते. Index वरून आपण वेगवेगळ्या Index शी तुलना करू शकतो. eg. Nifty & Sensex . ७. Trading : एखादया शेअर ची खरीदी किंवा विक्री आपण ठराविक वेळेसाठी करतो ...
Comments
Post a Comment