शेअर मार्केट म्हणजे काय ?
- शेअर मार्केट म्हणजे असे मार्केट जिथे शेअर्स ची देवान-घेवाण होते, म्हणजेच शेअर्स ची खरेदी विक्री होते. नोटबंदीनंतर (Demonetization ) लोकांनी Mutual Fund मध्ये गुंतवणूक करण्यास सुरु केली कारण सुरवतीला सर्वजण पैसे हे घरात ठेवायचे अणि नोटबंदीमुळे काही लोकाना ते पैसे गमावावे लागले. त्याचाच फायदा शेयर बाजाराला (Share Market ) झाला.
- ज्या ठिकाणी शेयर्स ची देवान-घेवाण होते त्याला Stock Exchange असे म्हणतात, भारतात मुख्य दोन Stock Exchanges आहेत ती म्हणजे
१. NSE (National Stock Exchange ) आणि
२. BSE (Bombay Stock Exchange )
Bombay Stock Exchange हे आशियातील सर्वात जुने Exchange आहे. त्याची सुरवात १८५६ साली झाली. National Stock Exchange ची सुरवात १९९२ साली झाली. हे दोन्ही Stock Exchanges मुंबई येथे आहेत.
- आता शेअर म्हणजे नक्की काय ते समजून घेऊया, शेअर म्हणजे कंपनीमधे हिस्सेदारी किंवा कंपनीमधे आपण जेवढे शेयर खरेदी करणार तेवढा मालकिहक्क. याला आपण एका उदाहरणातून समजून घेऊया, ABC नावाची कंपनी आहे, तिला Expansion साठी पैशांची गरज आहे. समजा तिला १ लाख रुपयांची गरज आहे तर ती कंपनी शेअर मार्केट मधे IPO (Initial Public Offer) launch करते अणि सामान्य लोकांकडून पैसे गोळा करते. समजा कंपनीने १०० रुपयाला १ शेअर अशी किंमत ठेवली तर १०० * १००० = १ लाख म्हणजेच कंपनी १००० शेअर्स issue करते. तुम्ही जेवढे शेअर खरेदी करणार ठेवढी हिस्सेदारी तुम्हाला भेटते.
- शेअर मार्केटमधून बऱ्याच लोकांनी पैसे कमावले आहेत आपणही कमावू शकतो फक्त शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे . Blog कसा वाटला कमेंट मध्ये कळवा.


Mast sir aadhi larn mag earn
ReplyDeleteBarobar 👍👍👍
ReplyDeleteChan explain kelat...Te hi marathi madhun....khup chan...👍👍👌
ReplyDelete