शेअर बाजारातुन गुंतवणुकीसाठी पहिला शेअर कसा निवडावा ? नमस्कार मित्रांनो , या ब्लॉग वर आपल्या सर्वांचे स्वागत. आज आपण शेअर बाजारातून पहिला शेअर कसा घ्यावा यावर बोलणार आहोत. चला तर मग सुरु करूया.... १. वॉरेन बफे म्हणतात कि अशा गोष्टीत गुंतवणूक करा जी तुम्हाला माहिती आहे, म्हणजेच अशे शेअर्स निवडा ज्याबद्दल आपल्याला डिटेल माहिती आहे. कोणाच्याही म्हणण्यानुसार कोणताही शेअर घेऊ नका. २. Market Capital (मार्केट कॅपिटल) - अशा शेअर्स मध्ये गुंतवणूक करा ज्या शेअर्स चे मार्केट कॅपिटल हे जास्त आहे. जास्त करून निफ्टी ५० च्या टॉप कंपन्यांमध्ये शेअर्स खरेदी करा कारण या इंडेक्स मधील सर्व शेअर्स हे Large Capital म्हणजेच या कंपन्यांचे भांडवल हे जास्त असते. शक्यतो Small Capital & Mid Capital कंपन्यांचे शेअर्स नवीन व्यक्तीने घेऊच नये. ३. Price - बऱ्याच वेळा असे होते कि लोक म्हणतात कि ३०० रुपये चा Sbi चा शेअर घेण्याऐवजी मी ५ रुपयाचा Suzlon चा शेअर घेतो. अशा शेअर्स पासून सावध राहणे योग्यच. कमी किमतीचे शेअर म्हणजे जास्त फायदा हा गैरस...