शेअर बाजारातुन गुंतवणुकीसाठी पहिला शेअर कसा निवडावा ?
नमस्कार मित्रांनो , या ब्लॉग वर आपल्या सर्वांचे स्वागत. आज आपण शेअर बाजारातून पहिला शेअर कसा घ्यावा यावर बोलणार आहोत. चला तर मग सुरु करूया....
१. वॉरेन बफे म्हणतात कि अशा गोष्टीत गुंतवणूक करा जी तुम्हाला माहिती आहे, म्हणजेच अशे शेअर्स निवडा ज्याबद्दल आपल्याला डिटेल माहिती आहे. कोणाच्याही म्हणण्यानुसार कोणताही शेअर घेऊ नका.
२. Market Capital (मार्केट कॅपिटल) - अशा शेअर्स मध्ये गुंतवणूक करा ज्या शेअर्स चे मार्केट कॅपिटल हे जास्त आहे. जास्त करून निफ्टी ५० च्या टॉप कंपन्यांमध्ये शेअर्स खरेदी करा कारण या इंडेक्स मधील सर्व शेअर्स हे Large Capital म्हणजेच या कंपन्यांचे भांडवल हे जास्त असते. शक्यतो Small Capital & Mid Capital कंपन्यांचे शेअर्स नवीन व्यक्तीने घेऊच नये.
३. Price - बऱ्याच वेळा असे होते कि लोक म्हणतात कि ३०० रुपये चा Sbi चा शेअर घेण्याऐवजी मी ५ रुपयाचा Suzlon चा शेअर घेतो. अशा शेअर्स पासून सावध राहणे योग्यच. कमी किमतीचे शेअर म्हणजे जास्त फायदा हा गैरसमज डोक्यातून काढून टाका.
४. Sectors - एकाच sector (क्षेत्रामध्ये) मध्ये सगळे शेअर्स घेऊ नका . वेगवेगळ्या क्षेत्रामधले शेअर्स घ्या कारण तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये शेअर घेतलाय तो दरवेळेस फायद्यात राहील असे नाही . त्यामुळे तुमच्या शेअर्स चे diversification करा म्हणजेच banking , Pharma , IT , FMCG अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शेअर्स घ्या जेणेकरून तुमचा तोटा हा कमी होईल.
५. News Base Stocks - ज्या शेअर्स ची news हि सारखी T V वर तुम्ही एकता त्या शेअर्स मध्ये नवीन व्यक्तीने गुंतवणूक करू नये . कारण तो शेअर्स तुम्हाला जास्त किंमत देऊन खरेदी करायला लागेल आणि कधी कधी तर तो शेअर आपण ज्या किमतीला घेतलाय त्या किमतीच्या खालीच जातो . जास्त वेळेस असेच होते आणि तुमचा Loss (तोटा) होतो.
६. Tips/ Calls - नवीन गुंतवणूकदाराने Tips पासून दूर राहिले पाहिजे . म्हणजेच तुम्हाला फोन करून काही माणसे सांगतील कि हा शेअर खूप चांगला आहे यामध्ये तुम्ही तुमचे पैसे गुंतवा. अशा Calls पासून सावध रहा.
७. Trading - नवीन गुंतवणूकदाराने ट्रेडिंग केलं नाही पाहिजे, ट्रेडिंग मध्ये तुमचे पैसे जाऊ शकतात. त्यासाठी आधी शिकावं लागेल. आणि जर करणार असाल तर सल्ला घेऊनच करा आणि Stop Loss लावूनच ट्रेडिंग करा.
बरेच नवीन व्यक्ती शेअर बाजारामध्ये येतात आणि म्हणतात कि मला लगेच पैसे मिळाले पाहिजे, मित्रांनो एक विचार करा तुम्ही २० वर्ष शिकता नंतर अनुभव घेता आणि मग कुठे १०-१५ हजाराची नोकरी करता आणि इथे तुम्हाला लगेच पैसे पाहिजे . यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल शिकावं लागेल आणि मग तुम्ही पैसे कमवू लागताल .
ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये कळवा आणि तुम्हांला पहिला शेअर घेण्यासाठी शुभेच्या.

Comments
Post a Comment