Skip to main content

शेअर मार्केट बद्दल चुकीच्या धारणा.

नमस्कार मित्रांनो,   stocks_marathi    या ब्लॉग वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी हा ब्लॉग चालू करत आहे कारण खूप असे  लोक आहेत ज्यांना शेअर मार्केट म्हणजे काय हे माहित नाही ? शेयर मार्केट  कसे काम करते आणि आपण त्यामधून कसे पैसे कमावू शकतो हे पण माहित नाही . तर सर्वात आधी लोकांच्या शेयर मार्केट  बद्दल चुकीच्या धारणा आहेत ते पाहूयात.

शेअर मार्केट बद्दल लोकांच्या बऱ्याच चुकीच्या धारणा आहेत .

१) शेअर मार्केट हा सट्टा आहे - तर मित्रानो ही  धारणा चुकीची पण आहे अन बरोबर पण कस काय ते आपण पाहू या . शेअर मार्केट मध्ये एखादा व्यक्ती नवीन आला अन त्यांनी काहीही न शिकता शेअर  बाजारामध्ये गुंतवणूक केली आणि त्याला नुकसान झाले तर तो व्यक्ती म्हणणार कि शेअर बाजार / मार्केट हा सट्टा  आहे आणि एखादा व्यक्ती आधी शेअर मार्केट म्हणजे काय आहे हे शिकतो त्यासाठी वेळ काढतो बाजारमध्ये शेअर्स चे भाव कसे कमी जास्त होतात याचा अभ्यास करतो आणि मग बाजारमध्ये गुंतवणूक करतो तेव्हा त्या व्यक्तीला नुकसान जरी झाले तरी म्हणणार नाही कि माझं नुकसान झालं तर त्याने काय चूक केली याचा तो अभ्यास करेल आणि परत गुंतवणूक करेल आता तुम्हीच सांगा हा सट्टा आहे कि बीझनेस .

२) शेअर मार्केट मध्ये  पैसे बुडतात -  वर सांगितल्या प्रमाणे शेअर मार्केट हा बीझनेस  हा आणि बीझनेस  आला कि नफा आणि तोटा हा आलाच . पैसे बुडतात हे मत  व्यक्ती नुसार बदलते जर पैसे बुडत असते तर राकेश झुनझुनवाला सारखे ज्यांनी  पाच हजार करोड रुपये शेअर बझारमधून कमावले यांनी कमावलेच नसते.
शेअर बाजारामध्ये पैसे बुडण्याचे  कारण  म्हणजे  माहितीची कमतरता आणि जी  माहिती उपलब्ध आहे ती  English  भाषेत आहे त्यामुळे सर्वांपर्यंत ही  माहिती पुरत नाही त्यामुळे पैसे बुडतात.

३) शेयर मार्केट मधे करियर होऊ शकत नाही -  सध्याच्या परिस्थितीला असे  बरेच लोक आहेत जे शेयर मार्किट करिअर म्हणून काम करतात. उदा. राकेश झुनझुनवाला , विजय केडीया , पोरिन्जु वेलियात इत्यादी, परन्तु त्यानी करिअर  हे लगेच घेतले नाही त्यासाठी त्यानी आधी मार्केट चा  अभ्यास केला अणि मग ते Stock  Market  या business  मधे आले.

Share market in marathi, Stocks_marathi


अशा बऱ्याच Topics  वर आपण बोलणार  आहोत . वरील माहिती कशी वाटली कमेंट मध्ये कळवा .
धन्यवाद !!!  

Comments

Popular posts from this blog

शेअर बाजारामध्ये पहिला शेअर घेण्यासाठी लागणाऱ्या महत्वाच्या गोष्टी

शेअर बाजारामध्ये पहिला शेअर घेण्यासाठी लागणाऱ्या महत्वाच्या गोष्टी.  शेअर मार्केट शिकण्याच्या या प्रवासात तुमचे स्वागत आहे.  आज आपण शेअर बाजारातून पहिला शेअर घेण्यासाठी लागणाऱ्या महत्वाच्या प्रक्रिया (Process) जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया .....  तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची असल्यास तुम्ही प्रथम दुकानात जाता त्याला पैसे देता आणि वस्तू घेता तसेच शेअर बाजारमध्ये पण आहे फक्त थोडं वेगळे आहे.  जस तुम्हाला वस्तू घायला दुकानात जायला  लागते तसेच इथे पण दुकान आहे त्या दुकानाला  Stock  Exchnge असे म्हणतात. पण या दुकानात जायचे म्हंटल कि तुम्हाला त्या दुकानाचे अकाउंट उघडायला लागतात .  १. Trading Account - हे पाहिलं अकाउंट वस्तू खरेदी करण्यासाठी, इथून तुम्ही कोणताही शेअर खरेदी करून शकता .  २. Demat  Account  - हे दुसरं अकाउंट जी वस्तू तुम्ही घेतली ती ठेवायला, याला आपण तुमची पिशवी म्हणू,  म्हणजेच Trading  Account मधून तुम्ही शेअर खरेदी करणार आणि ते Demat  Account (डिमॅट) मध्ये ठेवणार....

शेअर मार्केट म्हणजे काय ?

शेअर मार्केट  म्हणजे काय ? - शेअर मार्केट म्हणजे असे मार्केट जिथे शेअर्स  ची देवान-घेवाण  होते, म्हणजेच शेअर्स  ची खरेदी विक्री होते.  नोटबंदीनंतर (Demonetization ) लोकांनी  Mutual Fund  मध्ये गुंतवणूक करण्यास सुरु केली  कारण सुरवतीला सर्वजण पैसे हे घरात ठेवायचे अणि नोटबंदीमुळे काही लोकाना ते पैसे गमावावे लागले. त्याचाच फायदा शेयर बाजाराला (Share Market ) झाला. - ज्या  ठिकाणी शेयर्स ची देवान-घेवाण होते त्याला Stock Exchange असे म्हणतात, भारतात मुख्य दोन Stock Exchanges आहेत ती म्हणजे १. NSE (National Stock Exchange ) आणि २. BSE (Bombay Stock Exchange ) Bombay Stock Exchange हे आशियातील सर्वात जुने Exchange  आहे. त्याची सुरवात १८५६ साली झाली. National Stock Exchange ची सुरवात १९९२ साली झाली. हे दोन्ही Stock  Exchanges मुंबई येथे आहेत.  - आता शेअर म्हणजे नक्की काय ते समजून घेऊया,  शेअर म्हणजे कंपनीमधे हिस्सेदारी किंवा कंपनीमधे आपण जेवढे शेयर खरेदी करणार तेवढा मालकिहक्क. याला आपण एका उदाहरण...

शेअर बाजारच्या संकल्पना ?

शेअर बाजारच्या संकल्पना ? नमस्कार मित्रांनो, आज आपण शेअर बाजाराच्या (Market) संकल्पना (Concepts ) पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला शेअर मार्केट शिकताना त्याचा फायदा होईल. चला तर मग सुरु करूया....  १. समभाग (शेअर) : म्हणजेच एखाद्या कंपनीत आपण जेवढे शेअर घेतले आहेत तेव्हडा मालकीहक्क (Ownership). २. Exchange : म्हणजे जिथे शेअर्स ची देवाण घेवाण होते ते ठिकाण . e.g. NSE , BSE etc. ३. Volume : म्हणजे किती जणांनी एखाद्या शेअर्स मध्ये खरेदी किंवा विक्री केली आहे ती संख्या. ४. Market Capital : कंपनी किती मोठी आहे हे आपण Market Capital वरून ठरवतो. Market Capital = एका शेअर ची किंमत * एकूण शेअर्स  ५. Face Value : या value  ला Par Value असेही म्हणतात. Face Value ही १,२,५,१० एवढी असते आणि    Dividend हा कंपनीच्या  Face Value वर दिला जातो. ६. Index :  विशिष्ठ stocks च्या समूहाला म्हंटले जाते. Index वरून आपण वेगवेगळ्या Index शी तुलना करू शकतो. eg. Nifty & Sensex . ७. Trading : एखादया शेअर ची खरीदी किंवा विक्री आपण ठराविक वेळेसाठी करतो ...