- Get link
- X
- Other Apps
शेअर बाजारामध्ये पहिला शेअर घेण्यासाठी लागणाऱ्या महत्वाच्या गोष्टी. शेअर मार्केट शिकण्याच्या या प्रवासात तुमचे स्वागत आहे. आज आपण शेअर बाजारातून पहिला शेअर घेण्यासाठी लागणाऱ्या महत्वाच्या प्रक्रिया (Process) जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया ..... तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची असल्यास तुम्ही प्रथम दुकानात जाता त्याला पैसे देता आणि वस्तू घेता तसेच शेअर बाजारमध्ये पण आहे फक्त थोडं वेगळे आहे. जस तुम्हाला वस्तू घायला दुकानात जायला लागते तसेच इथे पण दुकान आहे त्या दुकानाला Stock Exchnge असे म्हणतात. पण या दुकानात जायचे म्हंटल कि तुम्हाला त्या दुकानाचे अकाउंट उघडायला लागतात . १. Trading Account - हे पाहिलं अकाउंट वस्तू खरेदी करण्यासाठी, इथून तुम्ही कोणताही शेअर खरेदी करून शकता . २. Demat Account - हे दुसरं अकाउंट जी वस्तू तुम्ही घेतली ती ठेवायला, याला आपण तुमची पिशवी म्हणू, म्हणजेच Trading Account मधून तुम्ही शेअर खरेदी करणार आणि ते Demat Account (डिमॅट) मध्ये ठेवणार....